Indian Flag: अमेरिकेत तिरंग्याचा अवमान; किरेन रिजिजू संतापले, म्हणाले,”याची मोठी किंमत…”
Indian Flag: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी न्यूयॉर्कमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलकांनी केलेल्या भारतीय ध्वजाच्या कथित विटंबनेवर तीव्र आक्षेप घेतला.

Indian Flag: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी न्यूयॉर्कमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलकांनी केलेल्या भारतीय ध्वजाच्या कथित विटंबनेवर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी आंदोलकांवर टीका करणारी एक पोस्ट शेअर केली.
रिजिजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आंदोलनाचा एक कथित व्हिडिओ शेअर करत म्हटले, “आम्ही नेहमीच सांगितले आहे की तुम्हाला आरएसएस, भाजप किंवा सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे, पण आमच्या देशाचा अपमान करू नका.”
किरेन रिजिजू संतापले Indian Flag:
केंद्रीय मंत्री म्हणाले, “लक्षपूर्वक ऐका… आमच्या ध्वजाचा आणि माझ्या देशाचा अपमान करू नका. याची तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल.” रिजिजू यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनबाहेर एक आंदोलक भारतीय ध्वजाची विटंबना करताना दिसत आहे, तर इतर आंदोलक खलिस्तान समर्थक घोषणा देत आहेत.
We always said, you have freedom to criticize RSS, BJP or Govt. but don’t abuse our nation.
ध्यान से सुनें.. हमारे झंडे और मेरे देश का अपमान मत करो। यह तुम्हें बहुत ज़्यादा महंगा पड़ेगा। pic.twitter.com/THH2kT49yc
— Kiren Rijiju (@KirenRijiju) August 30, 2026
शनिवारी मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील इन्फोसिस थिएटरमध्ये भारतीय-अमेरिकन समुदायाचे ६,००० हून अधिक सदस्य आणि विविध धर्मांच्या नेत्यांना संबोधित करताना, भागवत यांनी विविधतेचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत गैरसमज Indian Flag:
ते म्हणाले की, विविधतेतील एकता भारताच्या रक्तातच आहे. भागवत यांनी मान्य केले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आपल्या कार्याचा फारसा प्रचार न केल्यामुळे त्या संघटनेबद्दल काही गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यांनी लोकांना आवाहन केले की, संघटनेबद्दल कोणतेही मत बनवण्यापूर्वी त्यांनी संघटनेच्या आत डोकावून ती समजून घ्यावी.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आंदोलकांनी भारतीय तिरंग्याचा अपमान करून तो फाडला. आंदोलनादरम्यान ‘खलिस्तान जिंदाबाद’ आणि ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. खलिस्तान समर्थक न्यूयॉर्क शहरातील पोलिसांसमोर भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करत होते, परंतु अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.




