Corona Effect | जगातील 6वी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनाचा जबर फटका

वॉशिंग्टन- करोनाच्या विक्रमी साथीमुळे जगातील सहावी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसेल. त्याचा परिणाम जागतिक स्तरावर होईल, असे मत अमेरिका चेंबर ऑफ कॉमर्सने व्यक्त केले.
अमेरिकेतील सर्वात मोठा व्यावसायिकांचा गट असणाऱ्या चेंबरचे व्हाईस प्रेसिडेंट म्यारान ब्रिलीयंट म्हणाले, यअमेरिकेतील अनेक कंपन्यांनी आपले कार्यालय सांभाळण्यासाठी लाखो कामगारांना नियुक्त केले आहे त्यावर परिणाम झाला तर हे संकट अधिक गंभीर होईल. अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेण्याआधी ही सर्वात वाईट अवस्था येऊन गेली असेल. त्याचा खरा धोका भारतीय अर्थव्यवस्थेला बसेल.
भारतात पसरलेल्या या विषाणूचा फटका अमेरिकन अर्थव्यवस्थेलाही बसेल, हा एक चिंतेचा विषय आहे. मात्र सध्या आम्ही भारतीय नागरिकांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
चेंबर आणि 40 कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारताला तातडीने पाठवण्याच्या वैद्यकीय औषधे, ऑक्सिजन आणि अन्य मदतीसाठी सोमवारी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. नवीन पोर्टल उघडून त्यात अमेरिकन कंपन्यांच्या देणग्याची सोय केली आहे. या सहकार्यात यूएस इंडिया बिझनेस कौन्सिल, दि बिझनेस राउंड टेबल आणि यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक फोरम या संस्थाही सहभागी आहेत, असे फोरमने स्पष्ट केले आहे.
चेंबरचे पदाधिकारी आणि कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अँटनी ब्लिन्कन आणि व्हाईट हाऊसचे सल्लागार कर्ट कॅम्पबेल यांची भेट घेतली. भारतातील अर्थव्यवस्थेचे संकट आणि मानवी पेचप्रसंग याबाबत सखोल चर्चा केली.
अमेरिका आणि भारतात 2019 मध्ये 146.1 अब्ज डॉलरचा व्यापार झाला आहे.




