नवी दिल्ली – अमेरिकेत एक भारतीय दाम्पत्य आणि त्यांची कन्या घरामध्येच मृतावस्थेत आढळले आहेत. राकेश कमल (वय ५७), त्यांच्या पत्नी टीना (वय ५४) आणि त्यांची कन्या अरिना (वय १८) अशी या सर्वांची नावे आहेत, असे नॉरपॉक डिस्ट्रीक्ट ऍटर्नी मायकेल मॉरिसे यांनी सांगितले.
संध्याकाली ७.३० वाजण्याच्या सुमारास आलिशान डोवर मेन्शनमध्ये या सर्वांचे मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. डोवर मेन्शन हा भाग मॅसेच्युएटस प्रांताची राजधानी बोस्टनच्या नैऋत्येला ३२ किमोमीटरवर आहे.
टीना आणि राकेश कमल हे दाम्पत्य पूर्वी एड्युनोवा नावाची शिक्षण व्यवस्था कंपनी चालवत असायचे. राकेश कमल यांच्या मृतदेहाजवळ एक बंदूक सापडली असून ही हत्या म्हणजे कौटुंबिक हिंसाचार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
मात्र या तिघांचाही मृत्यू गोळ्या जाडल्यामुळेच झाला का, या प्रश्नाला अधिकाऱ्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. या हत्येमागील नेमका हेतू काय असावा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.