900 जणांना नोकरीवरुन काढणारे भारतीय सीईओ विशाल गर्ग सक्तीच्या रजेवर

न्यूयॉर्क – झूम मिटिंगवरुम तब्बल 900 जणांना नोकरीवरुन काढणाऱ्या सीईओ विशाल गर्ग यांना कंपनीने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. गेल्या आठवड्यात Better.com कंपनीचे सीईओ विशाल गर्ग यांनी झूम मिटिंगवरुन 900 जणांना नोकरीवरुन काढल्याचे जाहीर केले होते.
त्यानंतर गर्ग यांनी आपला माफीनामाही जाहीर केला होता. आता विशाल गर्ग यांना कंपनीने सक्तीच्या सुट्टीवर पाठवले आहे. त्यांच्या जागी चीफ फायनांशिअल अधिकारी केविन रायन कंपनीचे सर्व काम पाहणार आहेत.
मागील आठवड्यात विशाल गर्ग यांनी तीन मिनिटांच्या झूम मिटिंगद्वारे तब्बल 900 लोकांना नोकरीवरुन काढले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या प्रकरणानंतर कंपनी आणि विशाल याच्यावर जगभरातून टीका झाली होती. विशाल गर्ग यांना सोशल मीडियावर खडूस बॉस म्हणून म्हटले गेले.
या सर्व प्रकरानंतर कंपनीने विशाल यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. कंपनीची सर्व जबाबादारी सध्या केविन रायन यांच्याकडे सोपवली आहे. या सर्व प्रकरणावर Better.com या कंपनीकडून अधिकृत कोणतीही माहिती आलेली नाही.
दरम्यानन, 900 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करायचे की नाही? याबाबत कंपनीने कोणतीही सूचना अथवा इशारा दिला नव्हता. Better.com या कंपनीमध्ये जपानमधील एक सॉफ्ट बॅंकेची गुंतवणूक आहे. सध्या या कंपनीचे बाजारमूल्य 7 अब्ज डॉलर इतके आहे.

