‘हॉलिवूडमध्ये भारतीय कलाकारांना वापरून घेतात’

हॉलिवूडमध्ये भारतीय कलाकारांचा केवळ वापर करून घेतला जातो आहे, अशा शब्दात कंगना राणावतने हॉलिवूडवर जोरदार टीका केली आहे. बऱ्याच दिवसात कंगणाने कोणावर टीका केली नव्हती. हॉलिवूडच्या निमित्ताने ती आता पुन्हा सक्रिय झाली आहे.

हॉलिवुडमध्ये भारतीय कलाकारांना खूप ऑफर येतात. हॉलिवूडचे प्रलोभन दाखवून छोटासा रोल त्यांना दिला जातो. पण भारतीय कलाकारांच्या माध्यमातून हॉलीवुड केवळ आपला हेतू साध्य करत आहे. हॉलिवूडला आशियाई मार्केटमध्ये जम बसवायचा असतो. त्यासाठी भारतीय कलाकार आणि तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते असे कंगणा म्हणाली.

आपल्याला स्वतःलाही हॉलिवूडमध्ये काम करण्यास काहीच अडचण नाही. इतर कलाकारांनी हॉलीवूडमध्ये काम करू नये असंही आपण म्हणणार नाही. पण थिएटर फिल्मपेक्षा हॉलीवूडच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणे फायद्याचे होईल. भविष्यात आपल्यालाही अशा वेब शो ची ऑफर आली तर विचार करायला हरकत नसल्याचेही कंगणाने सांगितले.

अमेरिका आणि युरोपमधले प्रेक्षक थिएटर फिल्मपेक्षा वेब मीडियाला जास्त प्राधान्य देतात. म्हणूनच युरोप आणि आशियामधील फिल्म मेकिंग कोर्समधून आशिया आणि आफ्रिकेतल्या मार्केटला डोळ्यासमोर ठेवायला शिकवले जाते. हॉलिवूडच्या या धोरणाला अनुसरूनच भारत, चीन आणि अन्य आशियाई देशांमधील प्रेक्षकांना टार्गेट केले जात आहे. त्यासाठीच इथल्या कलाकारांना वापरून घेतले जात असल्याचे कंगणा म्हणाली आहे. तिच्या म्हणण्यामध्ये तथ्य असेलही, पण त्यामुळे हॉलीवूडचा महत्त्व कमी होत नाही. भारतीय कलाकारांनी जर हॉलीवुड मध्ये जायचे ठरवले तर त्यात त्यांची आणि पर्यायाने भारतीय सिनेमाची ही प्रगती होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×