शेपूट वाकडंच ! पाककडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन ; भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर

Indian Army on LOC। पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर शनिवारी रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. नियंत्रण रेषेच्या तुतमारी गली आणि रामपूर सेक्टरच्या समोर असलेल्या भारतीय चौक्यांवर पाकिस्तानवर गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याच्या म्हणण्यानुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते, अशा तणावपूर्ण परिस्थितीत ही गोळीबाराची घटना घडली आहे. या हल्ल्यासाठी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांना जबाबदार धरण्यात आले आहे, तर पाकिस्तानने कोणताही सहभाग नाकारला आहे आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले आहेत.
Indian Army responds effectively to Pakistan Army’s unprovoked firing
Read @ANI Story https://t.co/6wzToo3nC2#PahalgamTerrorAttack @LoC #IndianArmy pic.twitter.com/k6tpaGRwmN
— ANI Digital (@ani_digital) April 27, 2025
भारतीय सैन्य सतत कारवाईत Indian Army on LOC।
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य सतत कारवाई करत आहे आणि शोध मोहीम राबवली जात आहे. अलिकडेच कुलगाम जिल्ह्यातील तंगमार्ग भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. मात्र, दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.
काश्मीरमध्ये दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांवर मोठी कारवाई Indian Army on LOC।
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, अधिकाऱ्यांनी काश्मीरमधील अतिरेकी आणि त्यांच्या सहानुभूतीदारांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे, त्यांची घरे पाडली आहेत, लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत आणि शेकडो दहशतवादी मदतनीसांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, नऊ दहशतवाद्यांचे किंवा त्यांच्या साथीदारांचे घर पाडण्यात आले आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या इतरांवरही अशीच कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. पहलगामसारखा कोणताही हल्ला उधळून लावण्यासाठी सुरक्षा दल खोऱ्यातील ज्ञात अतिरेकी आणि त्यांच्या समर्थकांचा शोध घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.





