भारतीय सैन्याकडून खासदार संभाजीराजे छत्रपतींचा सन्मान
Updated On:

कोल्हापूर : भारतीय सेनेच्या दिल्ली मुख्यालयाकडून खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. जनरल ऑफिसर कमांडिंग, कर्नल ऑफ दी रेजिमेंट (मराठा लाईट इंफंट्री) लेफ्टनंट जनरल मिस्त्री यांनी संभाजीराजे यांच्या सैन्याविषयीच्या कार्याची दखल घेत हा सन्मान केला.
भारतीय सैन्य दलांचे आणि छत्रपती घराण्याचे शेकडो वर्षांचे घनिष्ठ नाते आहे. ती उज्ज्वल परंपरा जपून पुढे घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करत आहे. राजकीय, सामाजिक जीवनात कितीही व्यस्त असलो, तरी वेळात वेळ काढून मी सैन्य दलांच्या अधिकारी व सैनिकांच्या भेटी घेत असतो. सैन्य दलाच्या अनेक कार्यक्रमांना जात असतो. छत्रपती घराण आणि सैन्याला एकत्र जोडून ते नाते अजून घट्ट कसे करता येईल यासाठी माझे सदैव प्रयत्न असतात, असे संभाजीराजे यांनी सांगितले.





