भारतीय सैन्याला दुसऱ्या महायुद्धातल्या अमेरिकेच्या विमानाचे अवशेष अरुणाचलमध्ये सापडले

नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशातल्या रोईंग जिल्ह्यात 30 मार्च 2019 रोजी एका पोलिस प्रतिनिधीसह गस्त घालणाऱ्या 12 सदस्यीय भारतीय सैन्याला दुसऱ्या महायुद्धात वापरण्यात आलेल्या अमेरिकेच्या विमानाचे अवशेष सापडले. बर्फाखाली पाच फुट खोल हे अवशेष गाढले गेले होते. दिबांग जिल्ह्यातल्या स्थानिक ट्रेकर्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सैन्याचे विशेष गस्ती पथक रोईंगपासून 30 किलोमीटर अंतरावरच्या दुर्गम भागात विमानाच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले होते. या पथकाने सलग 8 दिवस दाट जंगल आणि हिमाच्छादिन भागात सुमारे 30 किलोमीटर परिसरात शोध घेतला. विमानाचे अवशेष सापडल्यामुळे यातून काही ऐतिहासिक माहितीचा उलगडा होण्यास मदत होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.