चंदिगढ – सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी आज मोठी कारवाई केली आहे. पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमारेषेवरून घुसखोरी करणाऱ्या पाच जणांना बीएसएफने ठार केले आहे.
माहितीनुसार, घुसखोर सीमारेषा पार करुन भारतात शिरण्याचा प्रयत्न करत असताना बीएसएफच्या जवानांनी त्यांना पाहिले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता घुसखोरांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारास जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये पाचही घुसखोर ठार झाले.
Alert troops of 103 Bn #BSF noticed suspicious movement of intruders violating IB. Upon being challenged to stop, intruders fired upon #BSF troops who retaliated in self defence. Resultantly, 05 intruders were shot. Intensive search ops is underway. pic.twitter.com/qwN5UoWC1A
— BSF PUNJAB (@BSF_Punjab) August 22, 2020