Asian Games 2023 ( Men’s Hockey) : कोरियावर मात करत Team India अंतिम फेरीत…

हांगझोऊ :- भारताच्या पुरुष हॉकी संघाने हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळताना आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या लढतीत बुधवारी भारतीय संघाने दक्षिण कोरियाचा 5-3 असा पराभव केला. अंतिम फेरीत दाखल झाल्यामुळे भारताचे आता किमान रजतपदक निश्चित झाले आहे.
अंतिम फेरीत भारताने विजय मिळवला तर त्यांना थेट पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळणार आहे.
उपांत्य लढतीत कोरियाच्या मांजे जुंग यानेच संघाचे तीनही गोल नोंदवले. त्याने 17, 20 व 42 व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक साधली. मात्र, तरीही त्यांना भारताकडून पराभव पत्करावा लागला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने 5 व्या मिनिटाला, मनदीप सिंगने 11 व्या मिनिटाला, ललिलकुमार उपाध्यायने 15 व्या मिनिटाला, अमित रोहिदासने 24 व्या मिनिटाला तर अभिषेकने 54 व्या मिनिटाला गोल केले.
यंदाच्या स्पर्धेत गोलचा धडाका मारत सगळे सामने एकतर्फी जिंकलेल्या भारताला या सामन्यात मात्र, कोरियाच्या गोलकीपरने चांगलीच लढत दिली. पहिल्याच हाफमध्ये कोरियाच्या मांजे जुंग यानेच संघाचे तीनही गोल केले परंतु त्यानंतर संपूर्ण सामन्यावर भारताचेच वर्चस्व राहिले.
After a brilliant battle against Korea in the semi final today #TeamIndia 🇮🇳 managed to comfortably take home the win and the confirmed podium finish.
We March on 🔥 for the final battle on 6th October where we take the defending champions Japan 🇯🇵
Catch all the live action on… pic.twitter.com/vIDbkfjFsB
— Hockey India (@TheHockeyIndia) October 4, 2023
पेनल्टीचे रूपांतर करण्यात पुन्हा अपयश…
भारतीय पुरुष हॉकी संघाला गेल्या दोन मोसमांपासून पेनल्टी कॉर्नर मिळाल्यावरही गोल करण्यात सातत्याने अपयश येत आहे. या सामन्यातही हेच घडले. भारताचा एक-दोन नव्हे तर तब्बल सहा वेळा ही संधी मिळाली होती. मात्र, त्यांना त्याचे एकाही गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. आता अंतिम सामन्यात तरी हे चित्र बदलणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.





