#CWC2019 : भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय, खेळ थांबवला

मॅंचेस्टर – विश्वचषक स्पर्धेत पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची सुरूवात खराब झाल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, 46.1 षटकानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.

पावसामुळं खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंड संघाच्या 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा झालेल्या आहेत. रॉस टेलर हा नाबाद 67 आणि टॉम लाथम हा नाबाद 3 धावांवर खेळत होते.

 

भारतीय गोलंदाजांनी आज प्रभावी मारा केला. गोलंदाजीत हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल यांनी 10 षटक पूर्ण केले असून प्रत्येकी 1 गडी बाद केला आहे. तर भूवनेश्वर कुमार याने 8.1 षटकांत 30 आणि जसप्रीत बुमराह याने 8 षटकांत 25 धावा देत प्रत्येकी 1 गडी बाद केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.