India vs Australia 4th Test : यशस्वी जैस्वाल खरचं आऊट होता का? अंपायरच्या निर्णयावरून वाद, पाहा व्हीडिओ

Yashasvi Jaiswal Wicket: बॉर्डर गावस्कर सीरिजमधील चौथ्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. मेलबर्न कसोटी सामन्यात विजयासाठी भारतासमोर 340 धावांचे लक्ष्य होते. भारतीय संघ 155 धावांपर्यंतच मजल मारू शकल्याने 184 धावांनी पराभव झाला. सामन्यातील दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जैस्वालने एकाकी झुंज दिली. त्याने 84 धावांची खेळी केली. मात्र, या सामन्यात जैस्वाल ज्या पद्धतीने आऊट झाला, त्यावरून आता वाद सुरू झाला आहे.
भारताच्या दुसऱ्या डावात एकामगोमाग एक खेळाडू आऊट होत असताना, जैस्वालने डाव सांभाळली होती. मात्र, पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात जैस्वाल झेलबाद झाला. मात्र, यावेळी जैस्वाल थोडा अनलकी ठरला.
कमिन्सच्या गोलंदाजीवर जैस्वालने फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, बॉल थेट यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीच्या हातात गेला. यावेळी ऑस्ट्रेलिया संघाकडून अपील करण्यात आले. मैदानावरील अंपायरने यशस्वीला नॉटआऊट दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने डीआरएसचा वापर केला. त्यावेळी तिसऱ्या अंपायर असलेल्या शारफुद्दौला यांनी मैदानावरील अंपायरचा निर्णय बदल यशस्वीला आऊट दिले.
“I can see the ball has made contact with the gloves. Joel, you need to change your decision.”
And with that, Jaiswal is out! #AUSvIND pic.twitter.com/biOQP4ZeDB
— 7Cricket (@7Cricket) December 30, 2024
रीप्लेमध्ये स्निको मीटरवर कोणतेही स्पाइक दिसत नव्हते. परंतु, तिसऱ्या अंपायरने बराच वेळ घेत डिफ्लकेशनच्या आधारावर यशस्वीला आऊट दिले. मात्र, आता या निर्णयावरून गदारोळ सुरू झाला आहे.
Yashaswi jayaswal was clearly not out. Third umpire should have taken note of what technology was suggesting. While over ruling field umpire third umpire should have solid reasons . @BCCI @ICC @ybj_19
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) December 30, 2024
Yashasvi Jaiswal was out, there is clear deflection as this graphic is showing. Fans should not look for controversies!!
Sometimes technology fails and here umpires has set example for all other umpires that you should not depend upon technology blindly. Snicko failed here. pic.twitter.com/uD9ZGnNP3U
— Rajiv (@Rajiv1841) December 30, 2024
जर कोणतीही खात्री नव्हती, तर तिसऱ्या अंपायरने मैदानावरील अंपायरचा निर्णय कायम ठेवायला हवा होता, असे अनेकजण म्हणत आहेत. भारताचे माजी क्रिकेटपूट सुनिल गावस्कर, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी देखील या निर्णयावरून नाराजी व्यक्त केली आहे. तर काहीजण अंपायरचा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त करत आहेत.
दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 184 धावांनी पराभव केला. यशस्वीची दुसऱ्या डावातील 84 धावांची एकाकी झुंज अपयशी ठरली. पहिल्या डावात देखील त्याने 82 धावांची शानदार खेळी केली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारतीय संघ 369 धावांपर्यंतच मजल मारू शकला. 105 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 234 धावा केल्या. त्यानंतर 340 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 155 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि रिषभ पंत वगळता कोणत्याही खेळाडूला दुहेरी धावांचा आकडा गाठता आला नाही.

