Asian Women’s Handball C’ship 2024 – आगामी 1 ते 10 डिसेंबर दरम्यान दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये प्रथमच आशियाई महिला हॅण्डबॉल स्पर्धेचे आयोज़न करण्यात येणार आहे. ही स्पर्धा अल्माटी, अझाकस्तान येथे आयोजित करण्यात येणार होती. मात्र तेथील अनपेक्षित परिस्थितीमुळे ही स्पर्धा भारतात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारताच्या बरोबरीने इराण, दक्षिण कोरिया, चीन, जपान, कझाकिस्तान, हाँगकाँग आणि सिंगापूर हे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे भारतात आयोजन करताना आनंद होत असून, ऐन वेळेस ही स्पर्धा भारताकडे देण्यात आल्यानंतर भारताने योग्य प्रकारचे नियोजन केल्याचा आनंद होत असल्याचे आशियाई हॅण्डबॉल फेडरेशनच्या तांत्रिक समितीचे संचालक अब्दुल्ला अल-तेब म्हणाले. इतक्या कमी वेळात महिला खेळाडूंना भारताने प्रोत्साहित केले असल्याबद्दल देखील त्यांनी प्रशंसा केली. Border-Gavaskar Trophy 2024/25 : भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाला ‘या’ खेळाडूची सर्वाधिक उणीव भासेल, मिचेल स्टार्कने केले स्पष्ट विधान… आशियाई स्पर्धेच्या विजेता संघ पुढील वर्षी जर्मनी व नेदरलँड येथे होणाऱ्या जागतिक महिला हॅण्डबॉल स्पर्धेसाठी पात्र होणार आहे. अव्वल चार संघ जागतिक स्पर्धेत थेट प्रवेश करणार आहेत. या स्पर्धेत भारत 8 व्यांदा सहभागी होणार असून यापूर्वी भारताने २००० व 2022 साली स्पर्धेत सहावे स्थान राखले आहे.