Sheikh Hasina | Bangladesh – भारत सरकारने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि तत्कालिन गृहमंत्री असदुझ्झमान खान कमाल यांना त्ताकाळ बंगालादेशच्या स्वाधीन करावे, अशी मागणी बांगलादेशातील हंगामी सरकारने केली आहे. विशेष न्यायाधिकरणाने या दोघांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच युनूस यांच्या सरकारने ही मागणी केली आहे. भारताने तात्काळ या दोन्ही दोषींना बांगलादेशच्या स्वाधीन करावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनामध्ये म्हटलेआहे. भारत आणि बांगलादेशमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या प्रत्यार्पण करारानुसार दोषी गुन्हेगारांनाचे प्रत्यार्पण करणे भारतासाठी अनिवार्य आहे. मानवताविरोधी गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आलेल्या व्यक्तींना आश्रय देणे म्हणजे मैत्री नसणे आणि न्यायाबद्दल आदर नसण्याची कृती समजली जाईल, असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. हसीना यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी भारतात आश्रय घेतला. तेंव्हापासून त्या भारतातच वास्तव्य करत आहेत. बांगलादेशाने त्यांना यापुर्वीच फरार घोषित केले आहे. गेल्या वर्षी बांगलादेशने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची औपचारिक मागणी केली होती. भारताने ही मागणी मिळाली असल्याचे मान्य केले होते. मात्र त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. आता हंगामी सरकार पुन्हा या मागणसाठी औपचारिक पत्रव्यवहार करेल, असे हंगामी सरकारच्या विधी सल्लागार आसिफ नझरुल यांनीही म्हटले आहे. फरार घोषित केलेल्या शेख हसीना यांना आश्रय दिल्याबद्दल बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या माजी पंतप्रधान खालेदा झिया यांनीही भारतावर टीका केली आहे. जमात-ए-इस्लामी, नॅशनल सिटीझन्स पार्टी या अन्य पक्षांनीही शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.