July PMI Index : सेवा क्षेत्राची वाढ साडेचार वर्षांच्या नीचांकी पातळीवर; जुलैचा PMI 53.3 वर घसरला
July PMI Index : तीव्र स्पर्धा आणि घटत्या मागणीमुळे जुलै महिन्यात भारताच्या सेवा क्षेत्राचा विकास दर साडेचार वर्षांच्या नीचांकी ५३.३ वर घसरला आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

July PMI Index : तीव्र स्पर्धा आणि घटत्या मागणीमुळे देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठांमध्ये नवीन व्यावसायिक मागण्या कमी झाल्याने, जुलैमध्ये भारताच्या सेवा क्षेत्राची वाढ साडेचार वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरली.
हंगामानुसार समायोजित एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस पीएमआय बिझनेस अॅक्टिव्हिटी इंडेक्स जूनमधील 57.4 वरून जुलैमध्ये 53.3 पर्यंत घसरला. हा साडेचार वर्षांतील सर्वात कमी वाढीचा दर आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाबा म्हणजे हा निर्देशांक अजूनही 50 अंकाच्या वर आहे.
अनेक महिन्यांच्या दमदार कामगिरीनंतर देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठांमध्ये नवीन व्यवसायाची वाढ मंदावल्यामुळे, जुलै महिन्यात भारताच्या सेवा क्षेत्राचा विस्तार किंचित मंद गतीने सुरू राहिला, असे एचएसबीसीचे मुख्य भारतीय अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाले.
नवीन व्यवसायाचा ओघ माफक गतीने वाढला. तीव्र स्पर्धा, घटती मागणी, बाजारातील नरम परिस्थिती आणि ऑर्डर पुढे ढकलल्या गेल्यामुळे वाढ मर्यादित राहिली. मात्र जुलै महिन्यात रोजगार निर्मितीच्या दरात सुधारणा झाली. तथापि, ही वाढ माफक होती. केवळ 6 टक्के कंपन्यांनी कर्मचार्यांची संख्या वाढल्याचे सांगितले. बहुसंख्य (92 टक्के) कंपन्यांनी कोणताही बदल झाला नसल्याचे सूचित केले.
किंमतींच्या आघाडीवर, जुलैच्या आकडेवारीने सेवा अर्थव्यवस्थेतील कच्च्या मालाच्या खर्चात आणखी वाढ दर्शविली. पॅनेल सदस्यांनी इंधन, कामगार, साहित्य, तंत्रज्ञान आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याचे संकेत दिले. दरम्यान, निर्यात व्यवसाय एक सकारात्मक बाब राहिली. कंपन्यांनी यूएई, यूके आणि यूएसमधून मिळालेल्या फायद्यांचा उल्लेख केला. व्यवसाय आत्मविश्वासाबाबत, सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, आत्मविश्वासाची एकूण पातळी जुलैमध्ये सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरली.
दरम्यान, एचएसबीसी इंडिया संयुक्त पीएमआय आउटपुट इंडेक्स जूनमधील 57.1 वरून जुलैमध्ये 54.3 पर्यंत घसरला. जो मार्च 2022 नंतरचा सर्वात कमकुवत विस्ताराचा वेग दर्शवतो. सेवा अर्थव्यवस्थेत विशेषतः तीव्र मंदी दिसून आली, तर कारखान्यांच्या उत्पादनात किंचित वाढ झाली.





