“भारत चंद्रावर पोहचला आणि आमची मुले गटारात…”; पाकिस्तानी खासदाराने दाखवलं वास्तव

Pakistan Parliament| पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे दिसत आहे. वाढत्या महागाईने तेथील जनता त्रस्त झाली आहे. इतकेच काय तर पाकिस्तानने देशातील सर्व कंपन्या विकण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच पाकिस्ताचे खासदार सईद मुस्तफा कमाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सईद मुस्तफा पाकिस्तानी सरकारवर टीका करताना दिसत आहे. तर यावेळी ते भारताचे कौतुक करत असल्याचेही दिसत आहे.
पाकिस्तानमधील मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM-P) चे खासदार सय्यद मुस्तफा कमाल यांनी संसदेत वास्तव मांडले आहे. ते म्हणाले की, “आज जग चंद्राकडे जात असताना कराचीतील गटारात पडून आमची मुले मरत आहेत. आपण जेव्हा टीव्हीवर भारत चंद्रावर पोहोचल्याची बातमी पाहतो, तेव्हा दुसऱ्याच क्षणी कराचीत उघड्या गटारात पडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी येते”. Pakistan Parliament Video |
پاکستان میں 2 کروڑ 62 لاکھ بچے اسکول نہیں جاتے، یہ تعداد 70 ممالک کی آبادی سے زیادہ ہے، اتنے زیادہ غیر تعلیم یافتہ بچے ہماری ساری اکنامک ڈویلپمنٹ کو تباہ و برباد کر دیں گے۔ سید مصطفیٰ کمال#Pakistan #Sindh #Karachi #MQMP #MustafaKamal #Nation #NationalAssembly #Parliament pic.twitter.com/maZ4RtV8m3
— Syed Mustafa Kamal (@KamalMQM) May 15, 2024
‘कराची हे पाकिस्तानचे महसूल केंद्र आहे. देशात दोन बंदरे असून दोन्ही कराचीत आहेत. पण गेल्या १५ वर्षांपासून कराचीला शुद्ध पाणी मिळाले नाही. जेव्हा जेव्हा पाणी येते तेव्हा टँकर माफियांकडून कब्जा केला जातो.” सईद मुस्ताफा यांनी पाकिस्तानातील मुलांच्या शिक्षणावरूनही सरकारला सुनावले आहे.
७० लाख मुले शाळेत जात नाहीत Pakistan Parliament Video |
एका अहवालाचा हवाला देत सय्यद मुस्तफा कमाल म्हणाले, “सिंध प्रांतात सुमारे ७० लाख मुले शाळेत जात नाहीत. राष्ट्रीय स्तरावर ही संख्या सुमारे २.६ कोटी आहे. कराची ही सिंध प्रांताची राजधानी आहे. आमच्याकडे एकूण ४८ हजार शाळा आहेत, परंतु यापैकी ११ हजार शाळा रिकाम्या आहेत. हे वास्तव समजल्यानंतर देशातील नेत्यांची झोप उडाली पाहिजे होती,” असे खडेबोल देखील त्यांनी पाकिस्तानी सरकारला सुनावले आहे.
हेही वाचा :
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य 63 तासांनी संपले; किती जणांचा झाला मृत्यू?





