India-Pakistan – ‘जर भारत थांबला तर आम्हीही थांबण्यास तयार आहोत, पाकिस्तानला आणखी नुकसान नको आहे’ असे विधान वाढत्या संघर्षाच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी आज केले. दार हे पाकिस्तानचे उपपंतप्रधानही आहेत. जिओ न्यूजशी बोलताना दार म्हणाले, आम्हाला स्वतःचे नुकसान करायचे नाही. आम्हाला विनाश आणि पैशाचा अपव्यय नको आहे. पाकिस्तानला नेहमीच शांतता हवी आहे आणि जर भारत यावेळी थांबला तर आम्ही शांततेचा विचार करू आणि प्रत्युत्तर देणार नाही किंवा काहीही करणार नाही. आम्हाला खरोखर शांतता हवी आहे. संघर्ष तीव्र झाला असताना त्यांनी हे विधान आले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आज भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी इशाक दार यांच्याशी बोलणी केली. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रेस स्टेटमेंटनुसार, भारत आणि पाकिस्तानमध्ये थेट चर्चेचे आवाहन करण्यात आले आहे. रुबियो यांनी तणाव कमी करण्यासाठी आणि थेट चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आणि सांगितले की तणाव केवळ संवादाद्वारे कमी केला पाहिजे