Photos : भारत की ऑस्ट्रेलिया..! जाणून घ्या, कोण आहे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा खरा किंग…?

Border-Gavaskar Trophy 2024/25 (IND vs AUS) : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आतापर्यंत 16 वेळा खेळली गेली आहे. 1996/97 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्यांदा ही मालिका खेळली गेली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी पर्थमध्ये खेळवली जाणार आहे.
पण त्याआधी, आतापर्यंत झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी कोणी किती मालिका जिंकल्या आहेत हे जाणून घेऊया.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 16 वेळा खेळली गेली आहे. या मालिकेस 1996/97 पासून प्रारंभ झाला. तर मालिकेचा शेवटचा हंगाम 2022/23 मध्ये खेळला गेला होता.
एकूण 16 मालिकांमध्ये टीम इंडियाने 10 वेळा आणि ऑस्ट्रेलियाने 5 वेळा विजय मिळवला आहे, तर एक मालिका अनिर्णित राहिली.
टीम इंडियाने मागील सलग चार मालिकांमध्ये विजयांची नोंद केली आहे. आता भारतीय संघ यावेळी विजयाचा पंच लगावणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Border-Gavaskar Trophy 2024/25 (हेड-टू-हेड रेकाॅर्ड)
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे होणार आहे. हा सामना 22 नोव्हेंबरपासून होणार आहे. या सामन्यादरम्यान भारताचा दिग्गज खेळाडू चेतेश्वर पुजारा हा कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसू शकतो. पुजाराने भारताकडून शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. जून 2023 नंतर तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकला नाही.












