India-New Zealand FTA : भारतासाठी न्यूझीलंडची बाजारपेठ खुली; 20 ऑक्टोबरपासून मुक्त व्यापार करार लागू
India-New Zealand FTA : भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार. 20 अब्ज डॉलर गुंतवणुकीसह भारतीय वस्तूंना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत मोठी संधी.

India-New Zealand FTA : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करार (एफटीए) 20 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी ही माहिती दिली. दोन्ही देशांनी वस्तू, सेवा आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी 27 एप्रिल रोजी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
या करारामुळे पुढील 15 वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात 20 अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे. तसेच कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान आणि सहकार्याला चालना मिळणार आहे.
न्यूझीलंडकडून सध्या सिरेमिक, गालिचे, वाहने आणि वाहनांच्या सुट्या भागांसह काही भारतीय वस्तूंवर 10 टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाते. करारामुळे या वस्तूंना अधिक सुलभ बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे.
मात्र दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, कांदा, हरभरा, मका, बदाम, कृत्रिम मध आणि साखर यांसारख्या संवेदनशील कृषी उत्पादनांना करारातून वगळण्यात आले आहे.





