न्यूयॉर्क – अमेरिकेच्या उत्पादनांवर लावण्यात येणारे आयात शुल्क कमी करण्याचे भारताने मान्य केले आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भारताकडून अमेरिकेच्या उत्पनन्नांवर वारेमाप आयात शुल्क लावले जात असल्यामुळे या उत्पन्नांची विक्री अमेरिकेत करणे अवघड होत असल्याच्या आपल्या दाव्याचा त्यांनी पुरनरुच्चारदेखील केला. आर्थिक आणि वित्तीय दृष्टिकोनातून आणि व्यापारी दृष्टिकोनातून आमच्या देशाला जगभरातील जवळपास प्रत्येक देशाने पूर्णपणे फसवले आहे, असे ट्रम्प ओव्हल कार्यालयात बोलताना म्हणाले. कॅनडा, मेक्सिको आणि तुम्ही मर्यादेच्या खाली गेला आहात. बारताकडून अमेरिकेवर वारेमाप आयात शुल्क लावले जाते. हे आयात शुल्क इतके जास्त आहे की या वस्तूंची विक्री भारतात केली जाऊ शकत नाही. या वस्तूंच्या विक्रीवर जवळपास निर्बंध आहेत. त्यामुळे आम्ही भारतात व्यवसाय करूच शकत नाही, असेही ते म्हणाले. मात्र आता बारताने आयात शुल्क कमी करण्यास मान्यता दिली आहे. कारण भारत आतापर्यंत जे काही करत होता, ते कोणीतरी उघड केले आहे. तसेच चीन, इतर अनेक देशांकडूनही आणि युरोपीय संघाकडूनही अमेरिकेचे भयानक शोषण केले जाते आहे, असेही ट्रम्प म्हणाले. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी त्यांचे समकक्ष हॉवर्ड लुटनिक यांच्याशी व्यापार चर्चेसाठी अमेरिकेला भेट दिल्यानंतर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले. या आठवड्यात ट्रम्प यांनी बारताकडून लावल्या जाणाऱ्या आयात शुल्कावर टीका केली आहे. भारताकडून अमेरिकेच्या वस्तूंवर खूप आयात शुल्क लावले जाते. त्यामुळे अमेरिका जशास तसे तत्वाने आयात शुल्काची आकारणी करणार असल्याचे ट्रम्प गुरुवारीच म्हणाले होते. दिनांक २ एप्रिलला भारत आणि अन्य काही देसांवर वाढीव आयात शुल्क लावले जाणार असल्याचे ट्रम्प कॅपिटलमधील संयुक्त सत्राला संबोधित करताना म्हणाले होते. पुर्वी ट्रम्प यांनी बारताला टेरिफ किंग म्हणूनही संबोधित केले होते. परस्पर हिताच्या मुद्यांवर चर्चा सुरू… पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या महिन्यात व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्या भेटीला गेले असता, परस्पर हिताच्या द्विपक्षीय व्यापार कराराबाबत वाटाघाटी केल्या जातील, असे दोन्ही बाजूंनी म्हटले होते, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैयस्वाल यांनी नवी दिल्लीत बोलताना सांगितले. वाणिज्य मंत्री गोयल अमेरिकेत होते आणि त्यांनी अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांशी चर्चा केली. दोन्ही सरकारे बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा पुढे नेण्याच्या प्रक्रियेत आहेत, असे त्यांनी सांगितले.