“भारताला तुझा अभिमान”; नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचे PM नरेंद्र मोदींकडून कौतुक

PM Modi on Neeraj Chopra | नीरज चोप्राने शुक्रवारी दोहा डायमंड लीग स्पर्धेत तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मीटर भाला फेकत विक्रमाची नोंद केली आहे. त्याने पहिल्यांदाच ९० मीटरचा टप्पा ओलांडत इतिहास रचला आहे. त्याच्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील कौतुक केले आहे. मात्र या स्पर्धेत नीरजला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
नीरजच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे. यात पंतप्रधान मोदींनी लिहिले, “ही एक उत्तम कामगिरी आहे. दोहा डायमंड लीग २०२५ मध्ये ९० मीटरचा टप्पा ओलांडल्याबद्दल आणि वैयक्तिक सर्वोत्तम फेक मिळवल्याबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन. हे त्याच्या अथक परिश्रमाचे, शिस्तबद्धतेचे आणि उत्कटतेचे फळ आहे. भारताला तुझा अभिमान आहे.”
A spectacular feat! Congratulations to Neeraj Chopra for breaching the 90 m mark at Doha Diamond League 2025 and achieving his personal best throw. This is the outcome of his relentless dedication, discipline and passion. India is elated and proud. @Neeraj_chopra1 pic.twitter.com/n33Zw4ZfIt
— Narendra Modi (@narendramodi) May 17, 2025
नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर
नीरज चोप्रानं पहिल्या प्रयत्नात 88.44 मीटर भाला फेकला. तर, दुसऱ्या प्रयत्नात तो अपयशी ठरला, त्याचा प्रयत्न बाद ठरला. नीरज चोप्रानं तिसऱ्या प्रयत्नात 90.23 मीटर भाला फेकला. नीरज चोप्रानं त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदा 90 मीटरचा टप्पा पार केला आहे. नीरज चोप्रानं चौथ्या प्रयत्नात 80.56 मीटर भाला फेकला. तो चौथ्या प्रयत्नापर्यंत पहिल्या स्थानावर होता. तर जुलियन वेबर 89.06 मीटरच्या भालाफेकीसह दुसऱ्या स्थानावर होता. जुलियन वेबरनं पाचव्या प्रयत्नात 91 मीटरपेक्षा अधिक अंतरावर भाला फेकला. ज्युलियन वेबरने त्याच्या शेवटच्या प्रयत्नात 91.06 मीटर लांब भालाफेक करून अव्वल स्थान पटकावले. यामुळे नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर पोहचला.
दरम्यान, डायमंड लीगच्या एका टप्प्यात प्रथम स्थान मिळवणाऱ्या खेळाडूला ८ गुण मिळतात. तर दुसऱ्या क्रमांकासाठी ७ गुण, तिसऱ्या क्रमांकासाठी ६ गुण आणि चौथ्या क्रमांकासाठी ५ गुण दिले जातात. नीरज चोप्राला या सामन्यात ७ गुण मिळाले, तर वेबरला ८ गुण मिळाले. डायमंड लीग २०२५ चा समारोप २७ आणि २८ सप्टेंबर रोजी झुरिच येथे होणाऱ्या डायमंड लीग फायनलने होणार आहे.
हेही वाचा
तब्बल 19 वर्षानंतर शाहरुखसोबत झळणार सुप्रसिद्ध अभिनेत्री; ‘किंग’ चित्रपटात करणार कॅमिओ?





