India Gold Market : ‘या’ कारणामुळे सोने खरेदीकडे नागरिकांनी फिरवली पाठ; गेल्या 3 महिन्यात 29 टक्क्यांनी घटली मागणी
India Gold Market : सोन्याच्या विक्रमी किमतींचा भारतातील खरेदीवर परिणाम झाला असून Q3 2026 मध्ये सोन्याची मागणी २९ टक्क्यांनी घटली. २०२६ मध्ये मागणी सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर जाण्याची शक्यता.

India Gold Market : सोन्याच्या विक्रमी वाढलेल्या किमतींचा परिणाम भारतातील खरेदीवर दिसून येत आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (WGC) अहवालानुसार, जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिसऱ्या तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी २९ टक्क्यांनी घटून १६२.५ टन झाली. गेल्या वर्षी याच काळात ही मागणी २२९.८ टन होती.
मात्र, सोन्याचे भाव वाढल्याने मूल्याच्या दृष्टीने मागणी ३ टक्क्यांनी वाढून २.४१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. या काळात सोन्याचा सरासरी भाव १,४८,८९१ रुपये प्रति १० ग्रॅम होता. गेल्या वर्षी तो १,०२,२८७ रुपये होता.
ज्वेलरीची मागणी २० टक्क्यांनी घटून ९९.९ टन झाली. तर सोन्याच्या नाणी आणि बारची मागणी तब्बल ४० टक्क्यांनी कमी होऊन ५५ टन राहिली. गोल्ड ईटीएफची मागणीही ५० टक्क्यांनी घटली. सोन्याचा आयातही ४६ टक्क्यांनी कमी होऊन ११४.१ टन झाला.
WGC च्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये भारतातील सोन्याची एकूण मागणी ६२५ ते ६७५ टन राहू शकते. ही मागणी सहा वर्षांतील नीचांकी ठरण्याची शक्यता आहे. मात्र, सण आणि लग्नसराईच्या काळात ज्वेलरीच्या मागणीत काही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. सोन्यातील गुंतवणुकीत बाजारातील जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.




