सीआरपीएफच्या तळावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड भारताच्या ताब्यात 

नवी दिल्ली – संयुक्त अरब अमिरातीने (युएई) जैश-ए-  संघटनेच्या अतिरेक्याला भारताकडे सोपविले आहे. निसार अहमद तांत्रे असे या दहशतवाद्याचे नाव असून रविवारी त्याला  विशेष विमानाने दिल्लीला आणणण्यात आले. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात दिले.

जम्मू-काश्मीरमधील लेथपोरा येथे सीआरपीएफच्या तळावर डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या हल्ल्याचा  निसार अहमद मास्टरमाईंड आहे. ३० आणि ३१ डिसेंबरच्या रात्री झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले होते. तर जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. नआयए कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांनी निसारविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. याच आधारे त्याला यूएईकडून भारतात आणले गेले.

निसार अहमद जैशचा दक्षिण काश्मीरमधील विभागीय कमांडर नूर तांत्रेचा भाऊ आहे. काश्मीर खोऱ्यात जैशला पाय रोऊ देण्यात नूर तांत्रेने महत्वाची भूमिका बजावली डिसेंबर २०१७ मध्ये चकमकीत त्याचा खात्मा झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.