Narendra Modi – युद्ध, अशांतता, इंधनांचे वाढते दर आदी आव्हानांशी सध्या संपूर्ण जगाला झुंजावे लागत आहे. मात्र, भारताने प्रभावीपणे स्थिती हाताळली, असे भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी त्याचे श्रेय मजबूत परराष्ट्र धोरणाला आणि जनतेच्या ऐक्याला दिले. पश्चिम आशियातील युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला बसत आहेत. भारतातही इंधन टंचाईसदृश पेच उद्भवला आहे. त्यासाठी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश कारणीभूत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्या टीकेचा समाचार मोदींनी अप्रत्यक्षपणे गुजरातमधील सभेत घेतला. पश्चिम आशियातील संघर्षामुळे जगभरात इंधनांच्या किमती १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. Middle East War: मात्र, आपल्या देशातील जनतेवर कुठला बोजा पडू नये याची दक्षता आमचे सरकार घेत आहे. कुठल्याही संकटाचा मुकाबला करण्याची क्षमता भारतात आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, विरोधकांवर आणि विशेषत: कॉंग्रेसवर शाब्दिक प्रतिहल्ला केला. राष्ट्रीय ऐक्याला पाठिंबा देण्याऐवजी विरोधक सध्याच्या स्थितीचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेत घबराट पसरवण्याचा, जनतेला चिथावण्याचा प्रयत्न ते करत आहेत, या आरोपाचा पुनरूच्चारही मोदींनी केला. हे देखील वाचा : PNG Usage increased: सिलेंडरला रामराम? युद्धाच्या पार्श्वभूमीवर PNGकडे झपाट्याने वळतायत नागरिक!