नवी दिल्ली – फिजीतील चक्रीवादळग्रस्तांसाठी भारताकडून देण्यात आलेल्या मदत सामग्रीचा पहिला साठा काल फिजी येथे पोहोचला. आणखी मदत 6 जानेवारीपर्यंत तेथे पोहोचेल. गेल्या महिन्यात फिजीला श्रेणी 5 तीव्रता असकेक्ता यसा चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आणि या वादळाने मोठी आर्थिक हानी तेथे झाली आहे.
याची गंभीर दखल घेऊन भारताने फिजीला मदत सामुग्री तातडीने रवाना केली आहे. त्यामध्ये निवासासाठी तंबू आणि स्वच्छता किट यांचा समावेश आहे. करोनाच्या साथीला देश तोंड देत असतानाही राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने कमी वेळात 6 टन मदत साहित्य एकत्रित केले आणि फिजी एअरवेजच्या मदतीने सिडनी, ऑस्ट्रेलिया मार्गे एअर इंडियाच्या विमानातून हे मदत साहित्य फिजी येथे रवाना केले.