मोठी बातमी ! पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त पगार ; 15000 रुपये थेट EPFO खात्यात

India Budget 2024 । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांचा हा सलग सातवा अर्थसंकल्प आहे. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात विकसित भारतासाठी 9 प्राधान्यक्रम जाहीर केले. यासोबतच गरीब, महिला, तरुण आणि अन्नदाते यांच्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार नोकरीच्या संधी वाढवण्यावर भर देणार असल्याचे सांगत त्यांनी पहिल्यादांच नोकरी करणाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं.
सरकार एक महिन्याचा पगार DBT द्वारे देईल India Budget 2024 ।
पंतप्रधान पॅकेजचा एक भाग म्हणून अर्थमंत्र्यांनी योजनांच्या माध्यमातून रोजगारक्षम कौशल्यांची घोषणा केली. त्या म्हणाल्या की, या योजना ईपीएफओमधील नामांकनांवर आधारित असतील, ज्यात पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखण्यावर भर असेल.
#Budget2024 | FM Nirmala Sitharaman says, “On the Amritsar-Kolkata industrial corridor we will support the development of an industrial nod at Gaya in Bihar. It will catalyse the development of the easter region. We will also support the development of road connectivity projects-… pic.twitter.com/ifc7t81YJs
— ANI (@ANI) July 23, 2024
#Budget2024 | FM Nirmala Sitharaman says, “On the Amritsar-Kolkata industrial corridor we will support the development of an industrial nod at Gaya in Bihar. It will catalyse the development of the easter region. We will also support the development of road connectivity projects-… pic.twitter.com/ifc7t81YJs
— ANI (@ANI) July 23, 2024
अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, सर्व औपचारिक क्षेत्रातील कामगारांना पहिल्यांदाच कार्यालयात प्रवेश केल्यावर एक महिन्याचा पगार मिळेल. एका महिन्याच्या पगाराचे थेट लाभ हस्तांतरण (DBT) 15,000 रुपयांपर्यंत, तीन हप्त्यांमध्ये प्रदान केले जाईल. या फायद्यासाठी पात्रता मर्यादा 1 लाख रुपये प्रति महिना पगार असेल आणि 2.1 लाख तरुणांना याचा लाभ अपेक्षित आहे.
10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार India Budget 2024 ।
ज्या लोकांना सरकारी योजनांतर्गत कोणताही लाभ मिळत नाही. त्यांना देशभरातील विविध संस्थांमध्ये प्रवेशासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. सरकार 3 टक्क्यांपर्यंत कर्ज देणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.





