नवी दिल्ली: जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मार्केल दोन दिवसांच्या भारत दौर्यावर आलेल्या आहेत. दरम्यान, पत्रकार परिषदेत दोन्ही देशांमधील सहकार्य वाढविण्यासाठी चर्चा झाली. तसेच भारत जर्मनीने अंतराळ, नागरी उड्डाण, जहाज वाहतूक तंत्रज्ञान, औषध व शिक्षण या क्षेत्रातील 11 करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, डॉ. मार्केल आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळांचे भारतात स्वागत केल्याने मला खूप आनंद झाला आहे. चॅन्सलर मार्केल यांची गणना केवळ जर्मनी आणि युरोपमध्येच नाही, तर बर्याच काळापासून जगातील अग्रगण्य नेत्यांमध्ये केली जाते. गेल्या दीड दशकांपासून त्यांनी भारत-जर्मन संबंध अधिक घट्ट करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
दर दोन वर्षांनी होणाऱ्या तीन आयजीसी बैठकींमध्ये मार्केल यांच्यासह भाग घेण्याचा बहुमान मला मिळाला आहे. या अनोख्या यंत्रणेमुळे, प्रत्येक क्षेत्रात आपले सहकार्य अधिक दृढ झाले आहे. भारत आणि जर्मनी यांच्यात प्रत्येक क्षेत्रात, विशेषत: नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानामध्ये दूरगामी आणि सामरिक निगम कार्यरत आहे याचा मला आनंद असल्याचे मोदी म्हणाले.