जयपूर – राजस्थानमधील अपक्ष आमदार सन्याम लोढा यांना आज विधानसभेतून मार्शलकरवी बाहेर काढण्यात आले. मंत्री शांती धारीवाल यांच्या बाषणाच्यावेळी अडथळे आणणे आणि घोषणाबाजी केल्याबद्दल लोढा यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले.
लोढा हे मुक्यमंत्री असोक गेहलोत यांचे सल्लागार आहेत. शून्य प्रहराच्यावेळी एका लक्षवेधी सूचनेदरम्यान सिरोही जिल्ह्यातील बारलूल येथे एका निष्पाप व्यक्तीला तुरुंगात टाकण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. सभापती सी.पी. जोशी यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत लोढा यांनी विधीमंडळ कामकाज मंत्री शांती धारीवाल यांच्या भाषणात व्यत्यय आणला आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
सभागृहाचे कामकाज अशाप्रकारे चालवले जाऊ शकत नाही. असे वर्तन केले तर यासारखी अप्रिय कारवाई करावी लागू शकते, हे अन्य सर्व आमदारांनी ध्यानात घ्यावे, असे सभापती सी.पी. जोशी म्हणाले.
सिरोही येथील प्रकरणाचा तपास केल्यानंतर दोषी पोलिसांविरोधात कारवाई केली जाईल. एक आठवड्याभरात या प्रकरणाचा तपास पूर्ण केला जाईल, असे धारीवाल यांनी सांगितले.