पिंपरी | डीआयएफटी फाऊंडेशन, डिफेन्स फोर्स लीगतर्फे स्वातंत्र्यदिन साजरा

पिंपरी, (प्रतिनिधी) – डीआयएफटी फाऊंडेशन, डिफेंस फोर्स लीग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आवारात स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी डिफेन्स फोर्स लीग संस्थेतर्फे सेवानिवृत्त सैन्य अधिकर्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले,. तसेच उपस्थितांनी अमर जवान स्मारक प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पित करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी सेवानिवृत्त सुभेदार कृष्णा काटेकर यांनी ध्वजारोहण केले व डिफेन्स फोर्स लीग चे पॅरा विंग अध्यक्ष कमांडो रघुनाथ सावंत यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले. डीआयएफटी फाउंडेशनचे संस्थापक नरेश गोल्ला, संचालक दृष्टी जैन, राजेंद्र जाधव यांनी स्वागत केले. राजू भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. मनोज गजभार यांनी नियोजन केले.
यावेळी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार, राजेश वसावे, निलेश केदार, राजू भालेराव, अॅड. अशोक बडेकर, अॅड.उमेश गवळी, मारुती भापकर, स्वप्नील कांबळे, महायान मसुरे, रवी कांबळे, राजेंद्र उजनीवाल यांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याचे आयोजन करण्यात डीआयएफटी फाउंडेशन, डिफेन्स फोर्स लीग, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यागमुर्ती माता रमाई स्मारक समिती, बौद्ध समाज विकास महासंघ, रयत विद्यार्थी विचार मंच, बुद्ध लेण्या मुक्ति आंदोलन समिती, अशोका बहुद्देशीय संस्था, समता दल यांचा सहभाग होता.





