इंदापूर : मोबाईल बँकिंग अँप वापरणारी व विक्रमी लाभांश देणारी इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्था असल्याने आदर्श ठरली आहे.असे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी काढले. इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव समारंभ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व्यंकटेश लॉन्स भिगवण येथे उत्साही वातावरणात पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळचे आमदार यशवंतराव माने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार भरणे म्हणाले,येणाऱ्या पुढील काळात संस्था आर्थिक सक्षम बनवा आणि पारदर्शी कारभार करून सभासदांची हित करणारे निर्णय घ्या.१०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा हि वैशिष्ट्यपूर्ण आहे.यावर्षी सभासदांना देण्यात आलेला सर्वात उच्चांकी ११.११ टक्के लाभांश हा संस्थेच्या अनोखा आदर्श आहे.असेही मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
या वेळी मोहोळ चे आमदार यशवंतराव माने यांनी संचालक मंडळ कोणतेही मानधन न घेता,किंवा कोणत्याही आर्थिक लाभ न घेता,करत असलेल्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले.सोसायटीचा कारभार करत असताना सभासद हित समोर ठेवून नेहमीच निर्णय घ्यावेत अशा सूचना ही दिल्या. यावेळी प्रस्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश दराडे यांनी केले.यानंतर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयांना सुरुवात झाली व सर्वांच्या उपस्थितीत सर्व विषय साधक – बाधक चर्चा होऊन सभासदांचे प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊन सर्व विषय बहुमताने मंजूर करून सभा संपन्न झाली.
याप्रसंगी स्वाभिमानी परिवाराचे अध्यक्ष नानासाहेब नरूटे,शिवाजीराव संघटनेचे अध्यक्ष अनिल आप्पा रुपनवर, शिक्षक अध्यक्ष ज्ञानदेव बागल,इबटा संघटनेचे अध्यक्ष मंगेश शेंडे , कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष सुहास मोरे, शिक्षक भरतीचे अध्यक्ष सतीश शिंदे, जुन्या पेन्शन संघटनेचे अध्यक्ष सचिन दराडे तसेच सर्व संचालक ज्येष्ठ मार्गदर्शक व सभासद बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत गुणगौरव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक सचिन देवडे यांनी केले तर शेवटी आभार उपसभापती संतोष गदादे यांनी मानले.