रेडा-माजी संसदीय व सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. माजी मंत्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंदापूर महाविद्यालय यांच्या वतीने वेबिनारचे आयोजन केले होते. महाविद्यालयाने स्वतः तयार केलेली 1001 बेलाच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. शिवाजी वीर, डॉ. भीमाजी भोर, डॉ. सदाशिव उंबरदंड उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. भरत भुजबळ यांनी केले. आभार प्रा. नागनाथ ढवळे यांनी मानले.