काही दिवसांपूर्वी टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्त्वाखाली कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी, बाद फेरी आणि फायनल अशा 3 सामन्यांमध्ये धुव्वा उडवत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. त्यानंतर महिला संघानेदेखील वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला लोळवलं.यानंतर आता पुन्हा एकदा इंडिया ए टीम पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या कुवेतची राजधानी दोहा इथे एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स स्पर्धा सुरु आहे. यामध्ये आज भारत-पाक पुन्हा भिडणार आहेत. कुठे होणार आहे सामना? इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना दोह्यातील वेस्ट एन्ड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडणार आहे. किती वाजता सुरु होणार सामना? हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. हा सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल? हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. हा सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल? मोबाईलवर सोनी लिव्ह ॲपमध्ये पाहायला मिळेल. वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष दरम्यान पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी याच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. वैभवने यूएई विरुद्ध आपल्या पहिल्याच सामन्यात 144 धावा केल्या होत्या. त्यामुळे वैभव पाकिस्तानविरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.