New Zealand Tour of India Test Series 2024 : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2019-21 स्पर्धेचा अंतिम सामना खेळणारे भारत आणि न्यूझीलंडचे संघ 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत आमने-सामने येणार आहेत. या मालिकेतील सामने बेंगळुरू(16 ते 21 आॅक्टोबर), पुणे (24 ते 28 आॅक्टोबर)आणि मुंबई(1 ते 5 नोव्हेंबर) येथे होणार आहेत. त्यापूर्वी लेजेंड्स लीग क्रिकेटच्या निमित्ताने ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत न्यूझीलंडचा माजी सलामीवीर मार्टिन गप्टिलने याने स्पष्ट मत व्यक्त करताना किवी खेळाडूनां एक सावधानतेचा इशारा दिला आहे. गप्टिल याने म्हटले आहे की, “भारताच्या आगामी कसोटी दौऱ्यावर आपल्या संघाच्या फलंदाजांसमोर फिरकी गोलंदाजांना तोंड देणे हे सर्वात मोठे आव्हान असेल. भारतात कधी कधी तुम्हाला असे वाटते की तुम्ही धावा करू शकत नाही. भारताची सर्वात कठीण गोष्ट म्हणजे येथील चेंडूच्या फिरकीचा अंदाज बांधणे कठीण आहे. कधी चेंडू आवश्यकतेपेक्षा जास्त वळतो तर कधी सरळ राहतो.” त्याने पुढे म्हटले आहे की, “कोणता चेंडू वळणार आहे आणि कोणता सरळ जाणार आहे हे तुम्हाला कधीच कळत नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला नेहमी विचार करत राहावे लागेल, तुम्हाला नेहमी मानसिकदृष्ट्या खंबीर आणि तुमच्या खेळाच्या शिखरावर राहावे लागेल.” भारतीय संघ घरच्या मैदानावर गेल्या 17 मालिकांमध्ये अपराजित आहे, ही बाब लक्षात घेत त्याने सांगितले की, “भारतावर विजय मिळवयाचा असेल तर अव्वल दर्जाचा खेळ करून त्यांच्यावर दडपण आणावे लागेल. पण, भारतीय संघावर तेही भारतात दडपण आणणे किंवा दबाब निर्माण करणे ही कोणत्याही संघासाठी कठीण बाब आहे. पण जेव्हा कधी अशी संधी मिळेल तेव्हा तीचा फायदा घेता आला पाहिजे.” Irani Cup 2024 : इराणी ट्रॉफीसाठी संघांची घोषणा, दोन मराठमोळे कर्णधार जेतेपदासाठी भिडणार, ‘या’ तारखेला होणार लढत… त्याने पुढे म्हटले की, “न्यूझीलंडच्या खेळाडूसाठी येथे खेळणे विशेषतः कठीण आहे. भरपूर उष्णता, आर्द्रता आणि हवामानामुळे खेळपट्टीवर होणारा बदल अशी परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल नाही तर विरोधात असेल.” रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांच्यापेक्षा न्यूझीलंडसाठी धोकादायक कोण असेल, असे जेव्हा गप्टिलला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, “दोघेही…! दोन्ही गोलंदाजांसमोर आमच्या फलंदाजांना सावध खेळ करावा लागेल ,पण जडेजालाही कमी लेखून चालणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारत बिकट स्थितीत असताना अश्विन व जडेजा या जोडीने संकटमोचक बनत फलंदाजीसह गोलंदाजीत कमाल करताना सामन्याचे चित्रच पालटून टाकले आणि विजयात महत्वपूर्ण योगदान दिले, हे विसरता कामा नये.