#CWC2023 #INDvNZ Semifinal 1 : रोहित शर्माच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद; ख्रिस गेलला टाकले मागे…

India Vs New Zealand World Cup 1st Semi Final 2023 Live Cricket Score: विश्वचषक स्पर्धेतील गट फेरीचे सामने संपले असून, पहिल्या उपांत्य सामन्यात यजमान भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. चार वर्षांनंतर या फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी 2019 मध्ये किवी संघाने कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न भंग करून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया उतरेल.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.भारताची फलंदाजी सुरू झाली आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी क्रीझवर आहे.रोहित शर्माने या सामन्यात तीन षटकार ठोकले असून विश्वचषकात 50 षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाराही तो खेळाडू ठरला आहे.
रोहित शर्मानं ख्रिस गेलचा विक्रम मोडला. विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत 28 षटकारांसह सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज ठरला आहे. या बाबतीतही त्याने 2015 च्या विश्वचषकात 26 षटकार मारणाऱ्या ख्रिस गेलला मागे टाकले.
रोहित शर्मा वेगाने धावा करत असून तो अर्धशतकाच्या जवळ आहे. सात षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद 61 इतकी झाली आहे.





