World Cup 1st Semi Final 2023 Ind vs Nz live Score: विराट कोहलीचे 50 वे एकदिवसीय शतक आणि श्रेयस अय्यरच्या शानदार शतकामुळे भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात 50 षटकात 4 गडी गमावून 397 धावा केल्या आहेत. शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनीही संघाला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले.न्यूझीलंड संघाला आता विजयासाठी 398 धावा कराव्या लागतील.
भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 117 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 105 धावांची खेळी केली. शुभमन गिलने नाबाद 80 धावा केल्या. कर्णधार रोहितने 47 आणि लोकेश राहुलने 39 धावांचे योगदान दिले.न्यूझीलंडकडून गोलंदाजीत टीम साऊदीने सर्वाधिक तीन आणि ट्रेंट बोल्टने एक विकेट घेतली.
भारतीय कर्णधाराने 29 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. या काळात हिटमॅनचा स्ट्राइक रेट 162.07 होता.कोहलीने 113 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 117 धावांची खेळी केली.अय्यरने 70 चेंडूत 150 च्या स्ट्राईक रेटने 105 धावा केल्या. अय्यरच्या खेळीत 4 चौकार आणि 8 लांब आणि नेत्रदीपक षटकारांचा समावेश होता.
यानंतर सूर्यकुमार यादव 50 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धावा काढून बाद झाला. पाचव्या क्रमांकावर आलेला केएल राहुल आणि सलामीला आलेला शुभमन गिल नाबाद माघारी परतले. गिलने 66 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 80 धावांची खेळी केली. तर केएल राहुलने 20 चेंडूत 195 च्या स्ट्राईक रेटने 39 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
न्यूझीलंडसाठी वेगवान गोलंदाज टिम सौदीने 10 षटकांत सर्वाधिक 100 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय बोल्टने 10 षटकांत 86 धावा देत 1 बळी घेतला. तर मिचेल सँटनरने 10 षटकांत 51 धावा, फर्ग्युसनने 8 षटकांत 65 धावा, रचिनने 7 षटकांत 60 आणि फिलिपने 5 षटकांत 33 धावा दिल्या.
कोहलीनं मोडला सचिनचा शतकाचा विक्रम..
विराट कोहलीने वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक पूर्ण केले आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याच्यासमोरच मोडीत काढला.हा सामना पाहण्यासाठी सचिन स्वतः वानखेडेवर उपस्थित आहे. अखेर विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याच्या नावे केलाय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून काढला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये विराटने 49 वे शतक झळकावून सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. सचिनने 452 एकदिवसीय डावात 49 शतके झळकावली होती. त्याचबरोबर कोहलीने 279व्या डावात 50 शतके झळकावली आहेत.
कोहली ठरला विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज…
विराट कोहलीने या विश्वचषकात 673 हून अधिक धावा केल्या आहेत आणि विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम (673) सचिनच्या नावावर होता.कोहलीने आज हा विक्रम मोडला. यापूर्वी सचिन तेंडुलकरनं 2003 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत 673 धावा केल्या होत्या. गेल्या 20 वर्षांपासून अबाधित असलेला हा विक्रम विराटनं यंदा मोडलाय.
एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा:
711 धावा – विराट कोहली (2023)
673 धावा – सचिन तेंडुलकर (2003)
659 धावा – मॅथ्यू हेडन (2007)
648 धावा – रोहित शर्मा (2019)
647 धावा – डेव्हिड वॉर्नर (2019)
रोहितच्या नावे आणखी एक विक्रम…
दरम्यान, रोहित शर्माने 29 चेंडूत 47 धावांची तुफानी खेळी केली. रोहितने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. रोहित शर्माने या सामन्यात तीन षटकार ठोकले असून विश्वचषकात 51 षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाराही तो खेळाडू ठरला आहे.
रोहित शर्मानं ख्रिस गेलचा विक्रम मोडला. विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत 28 षटकारांसह सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज ठरला आहे. या बाबतीतही त्याने 2015 च्या विश्वचषकात 26 षटकार मारणाऱ्या ख्रिस गेलला मागे टाकले.