IND vs NZ : कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, सर्वात घातक गोलंदाज झाला बाहेर…

IND vs NZ Test Series : कसोटी मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी न्यूझीलंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज बेन सियर्स (Ben Sears) दुखापतीमुळे भारतासोबत खेळल्या जाणाऱ्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. मात्र, त्याच्या जागी अनकॅप्ड खेळाडू जेकब डफीचा संघात समावेश करण्यात आला आहे.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज बेन सियर्स गुडघ्याच्या दुखापतीमुळे भारतासोबत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील प्रशिक्षणादरम्यान सियर्सला डाव्या गुडघ्यात दुखू लागले आणि गेल्या आठवड्यात न्यूझीलंडमध्ये त्याचे स्कॅन करण्यात आले. स्कॅनमध्ये त्याच्या मेनिस्कसमध्ये फ्रॅक्चर झाल्याचे समोर आल्यानंतर त्याला भारतात रवाना होण्यास उशीर झाला. कदाचित तो लवकरच तंदुरुस्त होईल, अशी आशा होती, त्यामुळे त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले, मात्र वैद्यकीय सल्ल्यानंतर त्याला मालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.
Squad News | Ben Sears has been ruled out of the upcoming Test series against India due to a knee injury and will be replaced by Jacob Duffy 🏏 #INDvNZhttps://t.co/oSjqrzKrSz
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 15, 2024
न्यूझीलंड बोर्डाने निर्णय घेतला आहे की अनकॅप्ड गोलंदाज जेकब डफी (Jacob Duffy) याला शियर्सच्या जागी संघाकडून बोलावण्यात आले आहे आणि तो आज शियर्सच्या जागी संघात सामील होईल. डफीने न्यूझीलंडकडून 6 एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी मालिकेतील पहिला सामना 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारतात आपला विक्रम सुधारण्याचा न्यूझीलंडचा असेल प्रयत्न…
न्यूझीलंड संघाचा भारतातील कसोटी विक्रम खूपच खराब आहे, ज्यामध्ये त्यांना येथे एकदाही कसोटी मालिका जिंकण्यात यश आलेले नाही, तर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 36 कसोटी सामन्यांपैकी केवळ 2 सामने त्यांनी जिंकले आहेत. न्यूझीलंडने 1988 मध्ये भारतात शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. एवढेच नाही तर भारतीय संघाने घरच्या मैदानावर न्यूझीलंड क्रिकेट संघाविरुद्ध एकही मालिका गमावलेली नाही





