IND vs NZ (Tea Break on Day 1 of the Mumbai Test) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडेवर खेळला जात आहे. किवी संघाने याआधीच मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत क्लीन स्वीपपासून बचाव करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली आहे. न्यूझीलंडने बंगळुरू येथे खेळली गेलेली पहिली कसोटी आठ गडी राखून आणि पुण्यात खेळलेली दुसरी कसोटी 113 धावांनी जिंकली होती.
पहिल्या दिवशी चहापानाच्या वेळेपर्यंत न्यूझीलंडने पहिल्या डावात सहा गडी गमावून 192 धावा केल्या आहेत. सध्या डॅरिल मिशेल 53 धावांवर तर ईश सोधी एका धावेवर नाबाद आहे. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन तर वॉशिंग्टन सुंदरने दोन बळी घेतले. आकाश दीपला एक विकेट मिळाली.
Tea Break on Day 1 of the Mumbai Test!
Ravindra Jadeja stars in the Second Session for #TeamIndia with 3⃣ strikes! 😎
Stay Tuned for the Third & Final Session of the Day!
Scorecard ▶️ https://t.co/KNIvTEy04z#INDvNZ | @imjadeja | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/R3GkGOGEc2
— BCCI (@BCCI) November 1, 2024
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. संघाला 15 धावसंख्येवर पहिला धक्का बसला. आकाश दीपने डेव्हॉन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला चार धावा करता आल्या. यानंतर कर्णधार टॉम लॅथमने विल यंगसोबत 44 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी वॉशिंग्टन सुंदरने मोडली. त्याने लॅथमला क्लीन बोल्ड केले. लॅथम 28 धावा करून बाद झाला. यानंतर सुंदरने रचिन रवींद्रलाही क्लीन बोल्ड केले. त्याला पाच धावा करता आल्या. सुंदरने सलग तीन डावात तिसऱ्यांदा रचिनला बाद केले.
IND vs NZ 3rd Test : जसप्रीत बुमराह तिसरी कसोटी का खेळत नाही? BCCI नं धक्कादायक अपडेट केले जारी…
रचिन बाद झाल्यानंतर यंगने डॅरिल मिशेलसोबत चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. यादरम्यान यंगने कसोटी कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. ही भागीदारी रवींद्र जडेजाने मोडली. जडेजाने किवी संघाच्या डावाच्या 44व्या षटकात दोन विकेट घेतल्या. त्याने प्रथम यंगला स्लिपमध्ये झेलबाद केले. त्यानंतर टॉम ब्लंडेल याला क्लीन बोल्ड केलं. यंगने 71 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी ब्लंडेलला खातेही उघडता आले नाही. यानंतर जडेजाने ग्लेन फिलिप्सलाही क्लीन बोल्ड केले. त्याला 17 धावा करता आल्या.