IND vs NZ 1st Test (Day 1) : पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द, टॉसही होऊ शकला नाही….

IND vs NZ 1st Test (Day 1) : बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संततधार पावसामुळे वाहून गेला. पावसामुळे टाॅसही होऊ शकला नाही. दुसऱ्या सत्रापर्यंत प्रतिक्षा केल्यानंतर पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ रद्द केल्याची घोषणा केली. याबाबत बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप लक्षात घेता टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं आधीपासूनच स्पष्ट होतं. तसेच या सामन्यात उर्वरित 4 दिवसही पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशात हा सामना रद्द होण्याची दाट शक्यता आहे.
🚨 Update from Bengaluru 🚨
Day 1 of the 1st #INDvNZ Test has been called off due to rain.
Toss to take place at 8:45 AM IST on Day 2
Start of Play: 9:15 AM IST #TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/RzmBvduPqr
— BCCI (@BCCI) October 16, 2024
नियोजित वेळेनुसार सामन्याआधी सकाळी 9 वाजता टॉस आणि 9 वाजून 30 मिनिटांनी खेळाला सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पाऊस सुरु असल्याने टॉसही होऊ शकला नाही. संततधार पावसाने बुधवारी खेळ होऊ दिला नाही. पाऊस अधून मधून थांबला असला तरी मैदान कोरडे करून सामना सुरू करता येईल इतका वेळ पाऊस थांबला नाही.
IND vs NZ 1st Test : बेंगळुरू कसोटीत यशस्वी जैस्वालला इतिहास रचण्याची संधी, फक्त ’71’ धावांची गरज….
दुसऱ्या दिवशी सामन्याच्या वेळेत बदल….
पंचांनीही दोन-तीन वेळा मैदानाची पाहणी केली, पण हाती निराशा लागली. दरम्यान, आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी वेळेत बदल करण्यात आल्याचे समोर आले आहे. जेणेकरून पहिल्या दिवशी षटकांचे नुकसान काही प्रमाणात कमी करता येईल. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी 8.45 वाजता नाणेफेक होणार आहे आणि 9.15 वाजता खेळ सुरू होईल.





