राजगुरूनगर : गावातील जातीय तणाव दूर करण्याचा गावातील सर्व नागरिकांनी प्रयत्न केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत, ही भावना समाजात रुजली पाहिजे, असे प्रतिपादन भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष विजय डोळस यांनी केले.
वि-हाम येथे भीमशक्ती संघटनेच्या 160 व्या शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांच्या हस्ते झाले. यावेळी भीमशक्ती संघटना खेड तालुका अध्यक्ष अनिल जाधव, खेड पश्चिम विभाग अध्यक्ष मारुती शिंदे, कार्याध्यक्ष विकास शिंदे, सुभाष शिंदे, संतोष शिंदे, विलास रोकडे, अक्षय घोडके, निलेश वाघमारे, सोनू भालेराव, वि-हाम भीमशक्ती शाखा प्रमुख एकनाथ रोकडे, अध्यक्ष अर्जुन रोकडे, उपाध्यक्ष शंकर रोकडे, कार्याध्यक्ष किरण रोकडे, गौतम रोकडे, सचिव नितीन रोकडे, विलास रोकडे, मधुकर रोकडे, सिद्धार्थ रोकडे, मधुकर रोकडे, कचर रोकडे, संजय रोकडे,राजाराम रोकडे, विश्वनाथ रोकडे,भीमराव रोकडे, संतोष रोकडे, प्रकाश रोकडे, प्रदीप रोकडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होते.
न्याय मिळवून देते. भीमशक्ती संघटना जातीपातीचे राजकारण करीत नाही तर सर्व समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी काम करते. खेड तालुक्यातील अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिला आहे. त्यासाठी अनेक जन आंदोलने केली आहेत.
– अनिल जाधव, अध्यक्ष, भीमशक्ती संघटना, खेड तालुका
विजय डोळस म्हणाले, भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार तथा माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या माध्यमातून राज्यात अनेक जाती धर्माच्या नागरिकांना न्याय देण्याचे काम केले. दीन-दलितांवर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी भीमशक्ती संघटना त्यांच्या मागे ठाम पणे गेली 30 वर्षांपासून उभी आहे. खेड तालुक्यात शांतता राखण्याचे काम संघटना करीत आह, असे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक किसन रोकडे यांनी तर अर्जुन रोकडे यांनी आभार मानले.