इंधनावरील खर्च वाढल्याने इतर खर्चाला कात्री

मुंबई – गेल्या काही महिन्यापासून इंधन कंपन्यानी इंधनाच्या दरात वाढ सुरु केली आहे. इंधनाशीवाय सक्रीय राहने शक्य नसल्यामुळे भारतीय ग्राहक आता इतर खर्चाला कात्री लावीत असल्याची आकडेवारी समोर येऊ लागली आहे.
स्टेट बॅंकेने क्रेडीट कार्डावरील खर्चाचा आढावा घेऊन ही आकडेवारी सादर केली आहे. डिसेंबर महिन्यात बिगर आवश्यक खर्च 65 टक्क्यांवर गेला होता. तर आवश्यक खर्चाचे प्रमाण 35 टक्के इतके होते. मात्र दरम्यानच्या काळात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आता आवश्यक खर्चाचे प्रमाण 65 टक्क्यावर गेले आहे.
तर बिगर आवश्यक खर्चाचे प्रमाण घसरून 35 टक्क्यांवर आले असल्याचे दिसून येत आहे. स्टेट बॅंकेचे सल्लगार सोम्या कांती घोष यांनी सांगितले की, लोकांनी आरोग्य, किराणा आणि इतर खर्च कमी करण्यास सुरूवात केली आहे.
करोना आल्यापासून ग्राहकांच्या क्रेडीट कार्डावरील खर्च करण्याच्या पध्दतीत वेळोवेळी बदल होत असल्याचे दिसून येत आहे. आता ग्राहक पुर्वपादावर येत असलतांनाच इंधनाचे दर वाढल्यामुळे ग्राहक पुन्हा बचतीच्या मानसीकतेत परत जात असल्याचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.





