Gold Silver Rates : सोने व चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या…आजचे दर

नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे दिल्ली सराफात सोन्याचा दर 335 रुपयांनी वाढून 57,463 रुपये प्रति दहा ग्रॅंम झाला. दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 516 रुपयांनी वाढून 68,075 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,880 आणि चांदीचा दर 22.45 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता, असे ही माहिती जारी केलेल्या एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेने म्हटले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/pm-modis-speech-in-lok-sabha-pm-modis-speech-in-parliament/
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, अमेरिकेने माफक व्याजदर वाढ केल्यानंतर आगामी काळातही माफक प्रमाणात व्याजदर वाढ करण्याची शक्यता खुली ठेवली आहे. अशा परिस्थितीत काही गुंतवणूकदार सोने खरेदी करीत असल्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत.





