मुंबई – सप्टेंबर अखेर संपलेल्या दुसर्या तिमाहीत पी एन गाडगीळ ज्वेलर्स या कंपनीचा महसूल 46 टक्क्यांनी वाढून 20,013 दशलक्ष रुपये इतका झाला आहे. या कालावधीत भारतात बरेच सण येतात. त्यामुळे या कंपनीच्या दालनाच्या श्रंखलातून विक्री वाढण्यास मदत झाली. दुसर्या तिमाहीत कंपनीचा नफा वार्षिक पातळीवर 59 टक्क्यांनी वाढून 349 दशलक्ष रुपये इतका झाला आहे.
गेल्या वर्षी दुसर्या तिमाहीत कंपनीचा महसूल 13,715 दशलक्ष रुपये होता. जुलैमध्ये केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात कपात केली होती. त्याचबरोबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात आल. या कालावधीत सोने आणि चांदीच्या दागिन्याची मागणी वाढण्यास मदत झाली. त्याचबरोबर या कालावधीत ही कंपनी मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन करते. या कालावधीत दर दिवशी मागणी 40 टक्क्यांनी वाढली. या कालावधीत कंपनीने मंगळसूत्राचे नवीन 2,000 डिझाईन ग्राहकांना उपलब्ध केली.
कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.डॉक्टर सौरभ गाडगीळ म्हणाले की, या तिमाहीत सोन्याचे दर कमालीचे अस्थिर होते. तरीही आमच्या विक्रीवर याचा फारसा नकारात्मक परिणाम झाला नाही. या तिमाहीत म्हणजे 17 सप्टेंबर 2024 रोजी कंपनीची शेअर बाजारावर नोंदणी झाली. भागधारकांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे ही नोंदणी नफादयक ठरली. आयात शुल्कात कपात झाल्यामुळे आता बाजारातील पारदर्शकता वाढली आहे. त्याचबरोबर ग्राहक अधिक संख्येने दागिन्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करीत आहेत.