नवी दिल्ली – रब्बी पिकांच्या पेरणीत आतापर्यंत बर्याच प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती कृषी मंत्रालयाने जारी केली. गव्हाची पेरणी 32.26 दशलक्ष हेक्टरवर झाली आहे, गेल्या वर्षी आतापर्यंत 32.24 दशलक्ष हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती. ऑक्टोबर महिन्यापासून रब्बीच्या पेरणीला सुरुवात होते मार्च महिन्यामध्ये रब्बीचे पीक हाती येते. तांदळाची लागवड आतापर्यंत वाढून 1.19 दशलक्ष हेक्टरवर झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत 1.30 दशलक्ष हेक्टरवर ही लागवड झाली होती. डाळीच्या लागवडीखालील क्षेत्र 13.34 दशलक्ष हेक्टरवर गेले आहे. गेल्या वर्षी 13.40 दशलक्ष हेक्टरवर डाळी घेतल्या गेल्या होत्या. गळित धान्याचे उत्पादन 9.42 दशलक्ष हेक्टरवर घेतले गेले आहे. गेल्या वर्षी हे क्षेत्रफळ 8.78 दशलक्ष हेक्टर होते. गळित धान्य आणि डाळींचे उत्पादन देशात वाढावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना यश आतल्या येत असल्याचे दिसून येत आहे. कारण भारत बर्याच प्रमाणात डाळी आणि खाद्यतेलाची आयात करतो. आतापर्यंत रब्बीसाठी एकूण 61.4 दशलक्ष हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी हे क्षेत्रफळ 60.74 दशलक्ष हेक्टर होते.