बॅंकांकडून ठेवीवरील व्याजदरात वाढ
Updated On:

बंगळूरु – बॅंकांकडून दिल्या जात असलेल्या कर्जाच्या प्रमाणात ठेवी वाढताना दिसत नाहीत. त्यामुळे बॅंका ठेवी आकर्षित करण्यासाठी ठेवीवरील व्याजदरात वाढ करीत असल्याचे दिसून येत आहे. उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेने आपल्या काही मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
सर्वसाधारण ग्राहकासाठी 80 आठवड्याच्या ठेवीवर व्याजदर आठ टक्के करण्यात आला आहे. तर याच कालावधीसाठी जेष्ठ नागरिकांनी केलेल्या ठेवीवर 8.75 टक्के व्याजदर मिळणार आहे. बॅंकेच्या 15 लाख ते दोन कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवीवर 0.20% चे अतिरिक्त व्याज मिळणार आहे. आम्ही ग्राहकांना त्यांच्या ठेवीवर जास्तीत जास्त व्याजदर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमच्याकडे ठेवी वाढतील असे बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक इतिरा डेव्हिस यांनी सांगितले.





