आर्थिक तोट्यातील पीएमपीला “दिवाळी बुस्टर’
Updated On:

पुणे – करोनामुळे आधीच तोट्यात असणाऱ्या पीएमपीला अधिकच फटका बसला. मार्चपासून स्थगीत केलेली प्रवासी सेवा सप्टेंबरमध्ये पूर्ववत झाली.
दरवर्षी दिवाळीनिमित्त उत्पन्नात वाढ होते. मात्र, यंदाची वाढ तुलनेने कमी असून, मागील दोन दिवसांत उत्पन्न 50 लाखांच्या घरात पोहोचले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा करोनामुळे स्थगीत होती. सप्टेंबरमध्ये ही सेवा अनलॉक झाली. परंतु, अनलॉक-1 मध्ये बसेसची धाव धिम्या गतीने सुरू होती. मात्र, मागील काही आठवड्यापासून हा वेग वाढला आहे.
दिवाळीदरम्यान मंगळवारी (17 नोव्हेंबर) रोजी पीएमपीचे उत्पन्न 49 लाख 77 हजार 861 रुपये होते. तर, प्रवासी संख्या 3 लाख 15 हजार 800 होती.
बुधवारी (18 नोव्हेंबर) उत्पन्न 49 लाख 35 हजार 842 रुपये होते. तर, प्रवासी संख्या 3 लाख 22 हजार 850 होती.





