बिचुकलेच्या अडचणीत वाढ; 2012 सालच्या खंडणी प्रकरणाची सुनावणी बाकी
Updated On:

सातारा : चेक बाऊन्स प्रकरणी कालपासून सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजित बिचुकलेला त्या प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्याच्या पुढील अडचणीत वाढ झाली आहे. 2012 साली त्याच्यावर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणाची आता सुनावणी सुरू आहे त्यामुळे अभिजित बिचुकलेच्या बाहेर येण्याच्या मार्गात तूर्तास तरी अडथळेच दिसत आहेत.
चेक बाऊन्स प्रकरणी सुट्टीकालीन न्यायाधीश आर. व्ही. पाटील यांच्यापुढे सुनावणी झाली. सुमारे एक तासहून अधिक सुरू असलेल्या युक्तीवादानंतर बिचुकलेला या प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला. बिचुकलेच्या बाजूने अॅड. शिवराज धनवडे यांनी तर फिर्यादीच्या बाजूने स्वतः फिर्यादी संदीप संकपाळ यांनी युक्तीवाद केला.





