नवी दिल्ली -केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहारविषयक समितीने बुधवारी घेतलेल्या निर्णयानुसार उसाच्या आधारभूत किमतीमध्ये 10 रुपयांनी वाढ करून ती 285 रुपये प्रति क्विंटल केली आहे.
यामध्ये देशातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले. यावर्षी देशात समाधानकारक पाऊस झाला असल्यामुळे उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.