कमल हासन यांच्या पक्षावर Income Taxची ‘रेड’

कोईम्बतूर – सिने अभिनेते कमल हासन यांच्या मक्कल निधी मय्यम या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर प्राप्तीकर विभागाने छापे घातले आहेत. तिरुपूर येथे हे छापे घालण्यात आल्याची माहिती हासन यांनी दिली. तसेच या छाप्यांमागे राजकीय हेतू असण्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
या छाप्यांमध्ये काय मिळाले, याचा तपशील प्राप्तीकर विभागाला जाहीर करू देत. मगच त्याबद्दल प्रतिक्रिया दिली जाईल, असे पत्रकारांशी बोलताना हासन म्हणले.
तामीळनाडूतील विधानसभेच्या निवडणूकीसाठी मक्कल निधी मय्यम पक्षाचा जाहीरनामा लवकरच जाहीर केला जाईल. दोन वर्षांपूर्वी त्यांनी जे काही सांगितले होते ते इतर पक्षांच्या जाहीरनाम्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला. मीळनाडूमध्ये 6 एप्रिलच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून कमल हासन कोईम्बतूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, असेही त्यांनी सांगितले.





