भोसरी, (प्रतिनिधी) – वडमुखवाडी येथील लक्षवेधी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात पालखी आळंदीतून पंढरीकडे मार्गस्थ झाल्या नंतरचा पहिला सकाळचा विसावा असलेले स्थान म्हणून ओळखले जाणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर हे होय. या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. नुकतेच या मंदिराचे ट्रस्टला आयकर खात्याने ८० जी प्रमाणपत्र दाखला दिला असल्याने सुरु असलेल्या मंदिर जीर्णोद्धारासाठी देणगीदारांचे माध्यमातून देणगी मिळण्याचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. मंदिरास देणग्या देऊन आयकर सवलत तसेच जीर्णोद्धारास सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी केले आहे. पुणे आळंदी या पालखी महामार्गावरील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून ते आता अंतिम टप्यात आले आहे. भाविक, नागरिक, देणगीदार, पदाधिकारी यांचे माध्यमातून व लोक सहभागातून भव्य आकर्षक, लक्षवेधी मंदिर उभे रहात आहे. या मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री विठ्ठल – रुक्मिणीमाता यांच्या लक्षवेधी भव्य मूर्ती गाभाऱ्यात भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ॲड. विष्णू तापकीर म्हणाले, श्री. संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट नोंदणी क्रमांक ई २५९३ या ट्रस्टला दिनांक ३१ मे २०२४ ला ८० जी प्रमाणपत्र मिळाले आहे. ट्रस्टचा नोंदणी क्रमांक AAVTS७०३२DF२०२४१ आहे. या सवलती मुळे मंदिराचे विकास कामाला गती मिळून जीर्णोद्धाराचे काम लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे