अंबरनाथमध्ये एका कारचालकाने ठरवून 5 जणांना चिरडलं

अंबरनाथ : अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या हीट अँड रन्स प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरला होता. मात्र अंबरनाथमधून एक अशी घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपी कार चालकाने ठरवून पाच जणांना उडवले आहे. जुन्या वादातून ही घटना घडल्याचे समजत आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
काय घडले नेमके?
अंबरनाथमधील जांभूळफाट्याजवळ ही घटना घडली आहे. मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे. टाटा हॅरीअर या एसयुव्हीने एका पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारचा पाठलाग केला होता. जेव्हा फॉर्च्युनर ही रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्यानंतर या टाटाच्या कारने पाठीमागून येऊन जोराची धडक दिली. फॉर्च्युनरला धडक दिल्यानंतर एका व्यक्तीला कारने फरफटत नेलं. यामध्ये त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातात 4 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.या अपघाताची माहिती समोर येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली.





